अल्पभूधारक शेतक-यांना रक्कम तातडीनं देणार - चंद्रकांत पाटील

अल्पभूधारक शेतक-यांना खरीपातल्या पेरणीसाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ही रक्कम तातडीनं देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आधीच पेरण्या झालेल्या आहेत. तरीही आवश्यक शेतक-यांना ही रक्कम दिली जाईल.

Updated: Jun 13, 2017, 04:16 PM IST
अल्पभूधारक शेतक-यांना रक्कम तातडीनं देणार - चंद्रकांत पाटील  title=

मुंबई : अल्पभूधारक शेतक-यांना खरीपातल्या पेरणीसाठी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ही रक्कम तातडीनं देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आधीच पेरण्या झालेल्या आहेत. तरीही आवश्यक शेतक-यांना ही रक्कम दिली जाईल.

राष्ट्रीयकृत बँकांमार्फत दिल्या जाणा-या या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कर्जमाफीबाबत शरद पवार यांच्याशी सरकारनं चर्चा केली. आधी शेतक-यांची आकडेवारी येऊ द्या, मग नक्की कशी कर्जमाफी द्यायची, याचा विचार करू, असं पवारांनी सांगितल्याची माहितीही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.