शेतकऱ्यांनंतर राज्य सरकारचे कर्मचारी संपाच्या तयारीत

शेतकऱ्यांच्या संपाचं वादळ अजून काही तासही झालेले नाहीत. तोच राज्य सरकारसमोर आणखी एका संपाचं भूत उभं राहिलंय. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत.

Updated: Jun 13, 2017, 03:20 PM IST
शेतकऱ्यांनंतर राज्य सरकारचे कर्मचारी संपाच्या तयारीत title=

मुंबई : शेतकऱ्यांच्या संपाचं वादळ अजून काही तासही झालेले नाहीत. तोच राज्य सरकारसमोर आणखी एका संपाचं भूत उभं राहिलंय. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत.

राज्यातले १९ लाख राज्यसरकारी कर्मचारी १२ ते १४ जुलै असे तीन दिवस संपावर जाणार आहेत. या तीन दिवसात राज्यभर निदर्शनंही करण्याचा कर्मचारी संघांचा मानस आहे. संदर्भातली नोटीस लवकरच सरकारला देण्यात येणार आहे. ७ व्या वेतन आयोग, अनुकंपा भरती, आणि 5 दिवसांचा आठवडा करणे आणि सरकारी सेवेत कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करा या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप करण्याचा निश्चयही कर्मचारी संघानं केला आहे.