सायन रूग्णालयातली शेकडो झाडं तोडण्यात आली, नक्की कारण काय?

मुंबई महानगरपालिकेच्या सायन रूग्णालयातील (Sion Hospital) शेकडो झाडं तोडण्यात आली. 

Updated: Jun 5, 2022, 11:39 PM IST
सायन रूग्णालयातली शेकडो झाडं तोडण्यात आली, नक्की कारण काय?  title=

मुंबई : जागितक पर्यावरण दिनीनिमित्ताने संपूर्ण राज्यासह मुंबईत अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अनेकांनी रोपटी ही लावली. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काय करायला हवं, पर्यावरण कसं राखता येईल, याबाबत अनेक व्याख्यानं तसेच विविध कार्यक्रमं पार पडली. मात्र या दिवशी दुर्देवाने मुंबईत शेकडो झांड तोडण्यात आली. (hundreds of trees were cut down at sion hospital for world environment day to house the hospitals doctors)

मुंबई महानगरपालिकेच्या सायन रूग्णालयातील (Sion Hospital) शेकडो झाडं तोडण्यात आली. रुग्णालयाच्या डॉक्टरांना राहण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या इमारतीसाठी झांडांची कत्तल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. जवळपास 120 झाडं तोडण्यात आली. 

इथली ११५ झाडं कापली जाणार असून ४३ झाडांचे स्थलांतर करणार असल्याचं पालिकेनं सांगितलंय. झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती मिळताच अभिनेते सयाजी शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली. तर ही झाडं वाचवणं गरजेचं असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हंटलंय.