महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर पोहोचण्याचे सोपे मार्ग कोणते?

Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: आज 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर येतात. अशावेळी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून खास सुविधा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 6, 2024, 10:16 AM IST
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर पोहोचण्याचे सोपे मार्ग कोणते?  title=

Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2024: आज 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर आले आहेत. दादरमधील चैत्यभूमी भीम  अनुयायांच्या गर्दीनं फुलून गेली आहे. सर्वत्र निळ वादळ पाहायला मिळतंय. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी रांगा लावल्याचं दितं आहे  शिवाजीपार्क मैदानात भीम अनुयायांसाठी पालिकेनं खास व्यवस्था केलीय. तसेच दादरवरुन चैत्यभूमीवर कसे पोहोचाल? हे पाहा. 

दादर आणि चैत्यभूमीवर अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्टने बसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. यंदा बेस्टकडून चैत्यभूमीसाठी विशेष सेवा देण्यात येणार आहे. 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत ही बससेवा असणार आहे. दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी या रुटवरील दर 15 ते 20 मिनिटांनी बससेवा पुरवली जाणार आहे. या शिवाय 60 रुपयांचा बस पास देखील प्रवाशांच्या सोयीसाठी मर्यादित कालावधीपर्यंत देण्यात येणार आहे.

(हे पण वाचा - Mahaparinirvan Din 2024: महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार) 

बससेवा 

मुंबईच्या विविध भागांतून चैत्यभूमीसाठी 4 डिसेंबरला बसमार्ग क्रमांक 200, 241, ए 351 आणि 354 यावर बससेवा चालवण्यात येणार आहे. 6 डिसेंबरला शिवाजी पार्क येथूनही सी 33, ए 164, 241, सी 305, ए 351, 354, ए-357, ए-385, सी-440 आणि सी-521 या बसमार्गावर अतिरिक्त बसचे सोडण्यात आल्या आहे. जेणेकरून नियमित प्रवासभाड्यात प्रवाशांना चैत्यभूमी येथे पोहोचणे शक्य होईल.

(हे पण वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?) 

आंबेडकर अनुयायी 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या आठवणी असलेल्या जागांना आवर्जून भेट देत असतात. यासाठी बेस्ट विभागाने विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. या बसही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाजवळून उपलब्ध करण्यात येतील. सकाळी साडेसात ते सकाळी 10 वाजेपर्यंत या फेऱ्या सेवेत असतील.

(हे पण वाचा - Mahaparinirvan Din 2024 : असं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कुटूंब; आज कोण काय करतात?) 

अनुयायांसाठी खास सुविधा 

  • सुरक्षेच्या अनुषंगाने चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सीसीसीटीव्ही कॅमेरा, फिरते कॅमेरा आणि मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅनर नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष आणि निरीक्षण मनोऱ्यांची उभारणीही करण्यात आली आहे. 
  • 2 अग्निशमन वाहने, अतिदक्षता रूग्णवाहिका, 4 बोटींची व्यवस्थ
  • चैत्यभूमी येथे शामियाना व व्ही. आय. पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था. 
  • नियंत्रण कक्षाशेजारी, तोरणा प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्गासह विविध ११ ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.
  • 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
  •  पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था.
  • संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था.
  • अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.
  • चौपाटीवर सुरक्षारक्षकांसहीत बोटींची संपूर्ण परिसरात व्य्वस्था.
  • चैत्यीभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
  • विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉल्स.
  • राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
  • स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवास.
  • मैदानात धूळ रोखण्यासाठी पायवाटेवर आच्छादन.
  • अनुयायांना मार्गदर्शनाकरीता 100 फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुगे.
  • मोबाइल चार्जिंगकरीता छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे पॉइंट.
  • फायबरची तात्पुरत्या स्नानगृहे व तात्पुरत्या शौचालये.