मुंबई : Heat wave in Mumbai : बातमी वाढत्या उकाड्याची. मुंबई आणि उपनगरात तापमान 39 अंशांवर गेले आहे. रोजच्या तुलनेत 5.6 अंशानं तापमान वाढल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. रात्री घामाच्या धारा लागल्या होत्या. मुंबईत उष्णतेची लाट आली आहे.
दरम्यान, विदर्भावर सूर्य नारायण कोपला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या जगातील सर्वाधिक उष्ण शहरांत विदर्भातील तीन शहरांचा समावेश झाला होता. विदर्भातले तापमान हे सहारा वाळवंटाहून जास्त नोंदवण्यात आले आहे. तामान वाढीत ब्रम्ह्मपुरीचा पहिला, चंद्रपूरचा दुसरा तर अकोल्याचा तिसरा क्रमांक लागला. जगातील पहिल्या 15 उष्ण शहरांमध्ये भारतातील 13 तर विदर्भातील 5 शहरांचा समावेश होता.
मुंबईत उष्णतेची लाट आलीय. 39 अंश सेल्सिअस इतका पारा वाढल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झालेयत. तर ठाण्यात 44.3 अंश सेल्सिअस तापमान वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत 5.6 अंशांनी अधिक वाढले आहे. मुंबई आणि उपनगरात दिवसाच्या कमाल तापमानात अचानक मोठी वाढ होऊन उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली.
काल सकाळी पावसाळी पावसाची रिमझीम झाली होती. तसेच सकाळी पावसाळी वातावरण आणि दुपारी तीव्र झळा अशी विचित्र परिस्थिती होती. (Climate change) मुंबईत सरासरी 32 ते 34 अंश इतकं तापमान असतं. पण, गुरूवारी तापमानात अचानक वाढ झाली आणि कमाल तापमान 39.3 अंशावर पोहोचले.
तर दुसरीकडे राज्यातील जनतेला लोडशेडिंगमधून दिलासा नाहीच. लोडशेडिंग अटळ असल्याची ऊर्जामंत्र्यांची कबुली दिली आहे. कोळसा टंचाईमुळे वीज संकट निर्माण झाले आहे. कोळसा टंचाईसाठी केंद्र सरकारवर राज्य सरकारने खापर फोडले आहे. त्यामुळे उकाड्यात लोड शेडिंग होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.