आदित्य ठाकरे वगळता विधानसभेचे सर्व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील

शिवसेनेला आज आणखी एक झटका बसला आहे. आणखी एक मंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहेत.

Updated: Jun 26, 2022, 04:24 PM IST
आदित्य ठाकरे वगळता विधानसभेचे सर्व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील title=

मुंबई : शिवसेनेला आज आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) हे आज एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) सहभागी होण्यासाठी गुवाहटीला पोहोचले आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वच कॅबिनेट मंत्री आहेत.

शिंदे गटातील मंत्री

एकनाथ शिंदे यांच्यासोबत दादा भुसे, गुलाबराव पाटिल, संदीपन भुमरे, उदय सामंत. राज्य मंत्री शंभूराज देसाई, अब्दुल सत्तारी, राजेंद्र पाटील येड्रावकर, बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता विधानसभेतील फक्त एकमेव मंत्री आदित्य ठाकरे राहिले आहेत. सुभाष देसाई आणि अनिल परब हे मंत्री देखील शिवसेनेसोबत आहेत. पण ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत. मंत्री शंकरराव गडख देखील आहेत पण ते क्रांतिकारी शेतकारी पक्षाचे आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. कोश्यारी यांनी मुंबई सीपी आणि महाराष्ट्र डीजीपी यांना पत्र लिहून यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना वाय प्लस सुरक्षा मिळाल्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, बंडखोर आमदारांना सुरक्षा मिळाली आहे आणि उद्या त्यांना हेलिकॉप्टरही मिळेल, आम्हाला त्याची पर्वा नाही. आज ना उद्या फ्लोर टेस्ट होईल, असे ते म्हणाले. मी तुम्हाला (बंडखोर आमदार) विधानसभेत माझ्यासमोर येऊन बसण्याचे आव्हान देतो, असेही ते म्हणाले.