टॅक्सीचालकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या रिपोर्टची प्रतिक्षा - अजित पवार

कॅबिनेट मिटींगमध्ये कोरोनाबाबत होणार चर्चा 

Updated: Mar 11, 2020, 01:04 PM IST
टॅक्सीचालकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या रिपोर्टची प्रतिक्षा - अजित पवार  title=

मुंबई : पुण्यात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता आणखी सहा जणांची चाचणी केली आहे. ज्याच्या अहवाल दुपारी 2 वाजेपर्यंत येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली आहे. अजित पवारांनी नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याची देखील माहिती दिली आहे. (पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह राहणाऱ्या बीडच्या तिघांवर आरोग्य विभागाची नजर) 

अजित पवार म्हणाले की,'कोरोना व्हायरस हा फार झपाट्याने फैलावतोय असं प्रकारच चित्र समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाबरून जाऊ नका.. स्वतःची काळजी घ्या. आरोग्य विभागाने जी काळजी घेण्यास सांगितली आहे त्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाळा. तसेच कॅबिनेट मंडळात कोरोना व्हायरसवर चर्चा करणार असल्यासं सांगितलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी देखील योग्य ते उपाययोजना राबवली आहे.'(पुण्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर)

पुण्यातही योग्य ती काळजी घेण्यास सांगितलं आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर उपचार घेण्यासाठी रूग्णालयात पुरेशी व्यवस्था केली आहे. दुबईतून आलेल्या पुण्यातील दाम्पत्याला मुंबईहून पुण्यात सोडणाऱ्या टॅक्सी चालकाला देखील याची लागण झाली आहे. म्हणजे अवघ्या तीन तासाच्या प्रवासात देखील ही लागण अगदी सहज होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचं देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 दिवसांपर्यंत कोरोनाची लागण होण्याची भीती असते. भारतात आल्यावर दहा दिवस लोटले आहेत. अजून अठरा दिवस आरोग्य विभाग या तिघांवर नजर ठेवून राहणार आहेत.