कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) शिवसेना (Shiv Sena) पक्षासह पक्षचिन्हावर दावा ठोकला. त्यानंतर शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही (Dasara Melawa) हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. राज्याच्या राजकारणात या दसरा मेळाव्याबाबत अनेक दिवस राजकारण रंगलं. शिंदे गट शिवतिर्थावर (Shivtirth) दसरा मेळावा घेण्यासाठी आक्रमक होतं. याच दसरा मेळाव्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. (dasara melawa 2022 held will in shivtirth says cm eknath shinde)
दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार. लवकरच आवश्यक त्या परवानग्याही मिळतील. त्यामुळे तुम्ही तयारीला लागा" असं आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ते कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. या दरम्यान त्यांनी ही घोषणा केल्याची माहिती आहे.
"मला एक वर्ष दसरा मेळाव्याची जबाबादारी दिली होती मी मैदानात मुंगीही शिरणार नाही एवढी गर्दी जमवली होती", असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
"गद्दारी आपण नाही त्यांनी केली आहे, आपल्याला ते गद्दार बोलतात. पण खरे गद्दार ते आहेत कारण निवडणुक एका सोबत लढले आणि सत्ता दुसऱ्ंयासोबत स्थापन केली. हे बाळासाहेबांचे विचार नाहीयत आपण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका", असं आवाहनही शिंदेंनी यावेळेस केलं.