मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोदी सरकारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'मी महाराष्ट्रातील २ मंत्र्यांची यासाठी नेमणूक केली आहे. याचा पाठपुरावा केला जाईल. हा जो विषय आहे तो कोर्टात आहे. पण तो न्यायालयात असल्यावरही कर्नाटक सरकार बेळगाव, निपाणीसह भाषिक अत्याचार करत आहे. या विरोधात वांरवार आवाज उठवला जात आहे.
केंद्र सरकारवर टीका
'केंद्र सरकार हे राज्य सरकारचं पालक असतं. प्रकरण कोर्टात असताना केंद्र सरकारने पालकत्वाची भूमिका दोन्ही राज्यांची घेतली पाहिजे. तुम्ही निपक्षपाती राहा. ठीक आहे, आमचं चुकलं त्यांचं चुकलं, जे कोणाचं चूकत असेल ती भूमिका तुम्ही कोर्टात सांगा. पण गेल्या ५ वर्षात केंद्र सरकार कर्नाटकच्या बाजुने बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ते संतापजनक आहे.'
गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद कायम आहे. बेळगावमधील कन्नड संघटनेच्या नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांमुळे सीमाप्रश्न पेटला होता. यानंतर शिवसेनेनं भाजपवरीही टीका केली होती. 'एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. धाडस करून बघाच,' असं आव्हान थेट सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलं होतं.