कुठून निवडून जाणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

विधानसभा की विधानपरिषद ? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

Updated: Feb 3, 2020, 11:32 AM IST
कुठून निवडून जाणार? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर title=

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार तर स्वीकारला आहे, मात्र आता त्यांना निवडणूक लढवून निवडून यावं लागणार आहे. उद्धव ठाकरे निवडणूक नेमकी कुठून लढणार याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात असताना स्वतः उद्धव ठाकरे यांनी यावर उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'ताबडतोबेने आता विधानपरिषदेची निवडणूक येईल. विधानसभा म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून... तर बघुयात. आता जी जबाबदारी आली आहे ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेमध्ये कोणाला ही न दुखवता विधानपरिषदेवर जायला काय हरकत आहे. ते मागल्या दारातनं, या दारातून... मी तर म्हणेल मी छपरावरुन आलो आहे.'