कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या सोहळ्याला साधू आणि महंतांसह अयोध्या आंदोलनाशी निगडीत संघटनांचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असला तरी मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचं नाव यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनेने गेली तीन दशकं संघर्ष केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार असे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे.
राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा मोदींना खोचक टोला
लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या काळात उद्धव ठाकरे अनेकदा अयोध्येला गेले होते. गेल्या अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली होती.
तसेच सूत्रांच्या मााहितीनुसार, आता राम मंदिरावर तीनऐवजी पाच कळस तयार करण्यात येणार आहेत. तसेच मंदिराची उंचीही १६१ फुटांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले?- दरेकर
५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मोदी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास अयोध्येत दाखल होतील. यानंतर तीन ते चार तास भूमिपूजन सोहळा चालेल. यासाठी काशीवरुन पंडितांना बोलावण्यात आले आहे.