मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष होता अशी धक्कादायक माहिती आता पुढं आलीय. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर निलंग्यात कोसळलं होतं.
या हेलिकॉप्टर अपघाताचा अहवाल मुख्य सचिवांना सादर करण्यात आलाय. डीजीसीएनं सादर केलेल्या या अहवालात, हेलिकॉप्टरमध्ये दोष असल्याचं नमूद करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सध्या देण्यात आलेत.