मुंबई : मेट्रनने एका आठ वर्षांच्या मुलीला मारहाण करुन तिला ओकारी चाटायला सांगितल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबईतील चेंबूरच्या चिल्ड्रन एड सोसायटीतील बालसुधारगृहात हा किळसवाणा प्रकार घ़डलाय. या बालसुधारगृहात डोंगरी येथून आलेली आठ वर्षाच्या मुलीला आणि तिच्या मैत्रीणीला संगीता पवार या मेट्रेनने मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर एका मुलीने उलटी केली तेव्हा संगीता पवार या मेट्रेनने त्या मुलीला चक्क उलटी चाटावयास सांगितली.
मानवतेला काळ्या फासणाऱ्या या घटनेममुळे बालगृह पुन्हा एकदा चर्चेत आलेय. या प्रकाराबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात संगीता पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या बालसुधारगृहात येणारी मुले ८ ते १२ वर्षे वयाची असून हरवलेली किंवा बालकामगार असतात.