Maharashtra Politics case : सत्तासंघर्ष प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे विधान

Eknath Shinde : सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर (Maharashtra Political Crisis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics case)  

Updated: Feb 17, 2023, 03:11 PM IST
Maharashtra Politics case : सत्तासंघर्ष प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे विधान title=
CM Eknath Shinde on the Maharashtra Politics case

Chief Minister Eknath Shinde : सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर (Maharashtra Political Crisis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics case) कोणताही निर्णय आला तरी सरकारला कोणताही धोका नाही, सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वेळकाढूपणा सुरु असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे.  (Political News in Marathi

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार आहे. प्रकरण तुर्तास पाच न्यायमूर्तींकडे राहणार असून, मूळ याचिकेसह 16 याचिकांवर मंगळवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. नबाम रेबिया प्रकरणाच्या (Nabam Rebia Verdict) गुणवत्तेवर मंगळवारच्या सुनावणीत चर्चा होणार आहे. त्यानंतर 7 बेंच जजेसकडे प्रकरण पाठवायचं की नाही हे त्यावेळी कळणार आहे. प्रकरण 5 बेंच जजेसकडेच राहिल्यास सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. 

 न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. 5 जजेसच्या बेंचकडे हे प्रकरण राहणार आहे. ठाकरे गटाची न्यायालयीन बाजू कमकूवत आहे. त्यामुळं ते 7 जजेसच्या बेंचची मागणी करत होते. त्यांची मागणी फेटाळली गेली आहे, असे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले. 21 तारखेपासून नियमितपणे या प्रकरणाची सुनावणी होईल, असे ते म्हणाले.

सत्तासंघर्षावर ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे.  हा फक्त 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे पाठवायचा का हाच मुद्दा होता. अध्यक्षांचे अधिकार आणि सदस्यांचे अपात्रतेचे मुद्दे दोन्ही बाजूंनी मांडले गेले.  7 जजेस बेंचकडे प्रकरण आत्ताच देणे योग्य नाही. 21 तारखेला घटनाक्रम पाहिलं जाईल. त्यात सर्व मुद्दे पुढे येतील. त्याचं विश्लेषण केले जाईल. त्यानंतर 7 जजेस बेंचचा विचार होईल. 21 जूनपासून घडलेल्या घटनांचे उद्देश पाहिला जाईल. सुनावणी दरम्यान नबाम राबिया प्रकरण येऊ शकते.  7 जजेस बेंचकडे केस पाठवण्याचा मार्ग मोकळा आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे.

सुप्रीम कोर्टात जोपर्यंत निकाल येत नाही तो पर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये. कोर्टाच्या सुनावणीला केवळ चार दिवस उरले आहेत. निवडणूक आयोग तोपर्यंत थांबेल अशी अपेक्षा आहे.  सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाचा परिणाम निवडणूक आयोगाच्या निर्णयावर होणार आहे, असे भाष्य अरविंद सावंत यांनी केले आहे.

सुप्रीम कोर्टात कुठेही 7 जजेस बेंचचा मुद्दा फेटाळला असं म्हटलेले नाही. उलट बारकावे पाहिले जाणार आहेत. या निर्देशाचा परिणाम केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर होणार आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत निकाल येत नाही तो पर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये, असे सावंत म्हणाले.