विचलित करणारा Video : बेस्ट बसचा भयंकर अपघात! ब्रेक फेल झाल्याने एकदोन नव्हे, तब्बल सात गाड्या...

विचलित करणारा Video 

Updated: Aug 10, 2022, 10:07 AM IST
विचलित करणारा Video : बेस्ट बसचा भयंकर अपघात! ब्रेक फेल झाल्याने एकदोन नव्हे, तब्बल सात गाड्या... title=
CCTV footage captured video of a massive accident best bus due to break failure

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत बेस्ट बस अपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्याची बाब निदर्शनास आली. असं असतानाच बुधवारी एक अशी घटना समोर आली, ज्यासंदर्भातील व्हिडीओ पाहून बरेचजण विचलित झाले. (CCTV footage captured video of a massive accident best bus due to break failure)

(Mumbai Goregaon) मुंबईतील गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या नगर परिषद परिसरात बेस्ट बसचा अपघात झाला. त्याचं सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासच्या हाती लागलं. अपघातात रिक्षा आणि दुचाकीचं प्रचंड नुकसान झालं. तर, दोनजण जखमी झाले. 

प्राथमिक माहितीनुसार जखमीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी बसमध्ये प्रवासीही होते. चालकाच्या सतर्कतेमुळं मोठा अपघात टळला. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं कळत आहे. परिस्थिती गंभीर असतानाही चालकाच्या सतर्कतेमुळं मोठा अपघात टळला. 

दिंडोशीकडून कुर्ल्याकडे (Kurla) जात असताना हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये बसनं समोरच्या सात गाड्या चिरडल्या. तर, चालक आणि वाहत जखमी झाले. बसमधील काही प्रवासांनाही इजा पोहोचल्याचं कळत आहे.