Mumbai News : मुंबईच्या (Mumbai Crime) मालाडमध्ये एका तरुणासोबत विचित्र अपघात झालाय. या अपघातात तरुणाचा पाय मोडला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मालाडच्या इन्फिनिटी मॉलच्या गेमिंग झोनमध्ये बाऊन्स जम्पिंग गेम खेळताना या तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गेम खेळताना उडी मारल्यानंतर बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा स्प्रिंग तुटल्याने हा तरुण खाली पडला. यामुळे तरुणाच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल करत आला असून एका आरोपीला अटक केली आली आहे.
तीर्थ कांजी बोरा असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 18 जून रोजी तीर्थ त्याच्या मित्रांसह मालाड पश्चिम येथे असणाऱ्या इन्फिनिटी मॉलमध्ये गेम झोनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. गेम झोनमध्ये तिकीट काढल्यानंतर तीर्थने बाऊन्स ट्रॅम्पोलिनमध्ये उडी मारली. तितक्यात बाऊन्स ट्रॅम्पोलिनचा स्प्रिंग तुटला आणि तीर्थ खाली पडला. त्यानंतर तीर्थचा उजवा पाय जास्त दुखू लागल्याने त्याला कुर्ल्याच्या क्रिटिकेअर एशिया रुग्णालमध्ये दाखल करण्यात आले. तीर्थला तपासल्यानंतर त्याच्या गुडघ्याच्या खाली फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुसरीकडे,19 वर्षीय तीर्थच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी इन्फिनिटी मॉलच्या गेमिंग झोनच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. तक्रारदार तीर्थ बोरा नातेवाईकांसह मॉलमच्या गेमिंग झोनमध्ये गेले होता त्याचवेळी हा अपघात झाला. घाटकोपर येथील रहिवासी असलेला तीर्थ बोरा कुर्ल्यातील क्रिटिकल केअर एशिया रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.
"मी माझ्या नातेवाईकांसोबत मॉलमध्ये आलो होतो. त्यावेळी ट्रॅम्पोलिनचे दोन स्प्रिंग फुटले आणि मी धातूच्या पृष्ठभागावर पडलो. त्यावेळी एक स्प्रिंग माझ्या गुडघ्याला लागली ज्यामुळे खूप दुखायला लागले. मॉलच्या कर्मचार्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली आणि मला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले, असे तीर्थ बोराने सांगितले.
बोरा याच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 336 (जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) आणि 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यामुळे गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
शाळेच्या तलावात बुडून मुलाचा मृत्यू
शुक्रवारी दुपारी दिंडोशीतल्या एका शाळेच्या तलावात 14 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. शार्दुल आरोलकर (१४) असे मृत मुलाचे नाव आहे. तो बोरिवली पश्चिम येथील योगी नगरमधील शासकीय वसाहतीत कुटुंबियांसोबत राहत होता.