दिवाळीच्या आसपास पावसाने निरोप घेतल्यानंतर राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. दिवाळी सरताच तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हवेत गारवा आहे तर काही ठिकाणी धुकं पसरलं आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी मोठ्या प्रमाणात असल्याचं जाणवत असून कोकणात आणि मुंबईत नागरिक गुलाबी थंडीची प्रतिक्षा करत आहेत.
महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झाला असून त्याच मुख्य कारण आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालं आहे. राज्यात अनेक ठिकाणी थंडी, धुकं आणि उष्णता यासारख्या वातावरणाला नागरिक सामोरे जाताना दिसत आहे. पुढील 48 तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हा राज्यातील हवामानावर होणार आहे.
#WATCH | Maharashtra: A layer of smog envelops Mumbai. Visuals from Bandra Reclamation. pic.twitter.com/nowtbLpkm1
— ANI (@ANI) November 10, 2024
निफाड येथे राज्यातील हवामानातील निच्चांकाची नोंद झाली आहे. 13.9 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर कमाल तापमानातील वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. रविवार म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यचा आहे.
#WATCH | Maharashtra: A thick layer of smog engulfs area near Bandra Kurla Complex as air quality continues to deteriorate in Mumbai pic.twitter.com/YQPk7y9VBX
— ANI (@ANI) November 10, 2024
राज्यात थंडीच वातावरण असताना कोकणात आणि मुंबईत मात्र उन्हाचे चटके मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. सांताक्रुझमध्ये तापमानाची नोंद झाली आहे. तसेच सोलापुर, पुण्यातही दिवसा मोठ्या उष्णता जाणवते तर संध्याकाळी हवेत गारठा असतो. मध्य महाराष्ट्रात पहाटेवेळी गारठा वाढला आहे.
मुंबईसह उपनगरात हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीनंतर हवेतील प्रदुषणात मोठा बदल झाला आहे. हवेत धुळीचे कण पाहायला मिळत आहे. सांताक्रुझ वांद्रे येथे धुळीचे कण आणि धुकं पाहायला मिळत आहे.