Sunday Panchang : आज अक्षय नवमीसह ध्रुव योग! आज आवळा वृक्षाला अतिशय महत्त्व, 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा!

10 november 2024 Panchang : आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. आज आवळा नवमी असल्याने आवळा वृक्षाची पूजा करण्यात येते. 

नेहा चौधरी | Updated: Nov 10, 2024, 08:41 AM IST
Sunday Panchang : आज अक्षय नवमीसह ध्रुव योग! आज आवळा वृक्षाला अतिशय महत्त्व, 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा! title=
sunday panchang 10 november 2024 luckiest zodiac sign on sunday panchang in marathi Akshay Navami 2024 and Amla Navami 2024

Panchang 10 november 2024 in marathi : आज कार्तिक महिन्यातील नवमी तिथी असून त्याला अक्षय नवमी किंवा आवळा नवमी असं म्हणतात.  या दिवशी भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते. आवळा रोपाची पूजा केल्यानंतर झाडाखाली बसून अन्न खाल्ल्याने भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची आशीर्वाद प्राप्त होते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची प्रदक्षिणाही केली जाते. याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूने कुष्मांडका या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या सणाला कुष्मांडक नवमी असेही म्हणतात. आवळ्याच्या झाडामध्ये देवी-देवतांचा वास मानला जातो. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. तर आज ध्रुव योग, रवि योग आणि घनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र कुंभ राशीत आहे. (sunday Panchang)  

आवळा नवमी पूजेसाठी शुभ मुहूर्त :  सकाळी 07:05 ते दुपारी 12:20 पर्यंत

पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1:20 ते 2:45 पर्यंत असेल.

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. अशा या रविवारचं राहुकाळ, नक्षत्र, शुभ मुहूर्त, अशुभ वेळ जाणून घ्या.  (saturday panchang 10 november 2024 luckiest zodiac sign on saturday panchang in marathi ) 

पंचांग खास मराठीत! (10 november 2024 panchang marathi)

वार - रविवार
तिथी - नवमी - 21:03:23 पर्यंत
नक्षत्र - धनिष्ठा - 11:00:21 पर्यंत
करण - बालव - 09:59:23 पर्यंत, कौलव - 21:03:23 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - घ्रुव - 25:41:20 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:40:10
सूर्यास्त - 17:29:43
चंद्र रास - कुंभ
चंद्रोदय - 13:52:00
चंद्रास्त - 25:22:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:49:32
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 16:03:06 पासुन 16:46:24 पर्यंत
कुलिक – 16:03:06 पासुन 16:46:24 पर्यंत
कंटक – 10:16:41 पासुन 10:59:59 पर्यंत
राहु काळ – 16:08:31 पासुन 17:29:42 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:43:17 पासुन 12:26:36 पर्यंत
यमघण्ट – 13:09:54 पासुन 13:53:12 पर्यंत
यमगण्ड – 12:04:56 पासुन 13:26:08 पर्यंत
गुलिक काळ – 14:47:19 पासुन 16:08:31 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:43:17 पासुन 12:26:36 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)