मुंबई : उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट बनवण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. अश्लील चित्रपट बनवून अॅपवर डाउनलोड केल्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. राज कुंद्राविरोधात त्यांच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे. (Raj Kundra Arrested)
हा व्हिडिओ अपलोड करणार्या उमेश कामथलाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 2021 फेब्रुवारीमध्ये मुंबईत गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट (soft pornography film) बनविण्याबद्दल आणि काही अॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. याच्या तपासणीत राज कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. त्यानंतर या प्रकरणात सोमवारी रात्री कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली. तसेच व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामथ (Umesh Kamath) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या एफआयआरनुसार राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. याप्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता आणि आता राज कुंद्रा याला अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी त्याचे मेडिकल केले आणि आता कुंद्राला कोर्टात हजर केले जाणार आहे.
मुंबई पोलिसांनीही 26 मार्च रोजी याच प्रकरणात एकता कपूर हिचा जबाब नोंदवला होता. महाराष्ट्र सायबर सेलने यापूर्वी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांचेही जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणात मुख्य सूत्रधार असू शकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्रा असे सांगते की, राज कुंद्रा यानेच तिला पॉर्न फिल्म उद्योगात आणले.
शर्लिन चोप्रा हिला प्रत्येक प्रकल्पासाठी 30 लाख रुपये दिले जायचे. शर्लिन हिच्या म्हणण्यानुसार तिने असे 15 ते 20 प्रकल्प केले आहेत. हे चित्रपट कोठे आणि कोण अपलोड करायचे याविषयी आता पोलिसांना नवीन माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट देशातून नव्हे तर परदेशातून अपलोड केले गेले होते आणि राज कुंद्रा याच्या जवळच्या नातेवाईकाने अपलोड केले होते.
आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासानुसार लंडनमधून सॉफ्ट पोर्नोग्राफीसंबंधी चित्रपट अपलोड करण्यात आले होते. हे काम उमेश कामथ नावाच्या व्यक्तीने केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कामथ यांने अॅप्लिकेशन बेस वेबसाइटवर नवीन अभिनेते आणि अभिनेत्रींवर चित्रित केलेले व्हिडिओ देखील अपलोड केले होते. पोलिसांनी असेही म्हटले आहे की आतापर्यंत 90 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ शूट केले गेले आहेत आणि ते अपलोड केले गेले आहेत.
सॉफ्ट पोर्नोग्राफीचा हा संपूर्ण खेळ पहिल्यांदा चर्चेत आला जेव्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री गहना वशिष्ठला गेहाना वसिष्ठ (Gehana Vasisth) अटक केली. गेहाना वसिष्ठ हिच्या अटकेनंतर हळूहळू या प्रकरणातील प्रकार उलगडण्यास सुरुवात झाली. पोर्नोग्राफिक चित्रांचे शूटिंग सुरू असलेल्या मुंबईतील मालाड पश्चिम येथे मढगांव येथे एक बंगला भाड्याने घेण्यात आल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी येथे छापा टाकला त्यावेळीही अश्लील चित्रपटांचे शूटिंग सुरू होते. हे अश्लील चित्रपट आणि व्हिडिओ एका नव्हे तर बर्याच साइटवर अपलोड केले गेले आणि पैसे कमावले.
प्रत्यक्षात 19 जुलै रोजी गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला चौकशीसाठी बोलावले होते. राज कुंद्रा रात्री 9 वाजता मुंबई गुन्हे शाखेच्या भायखळा कार्यालयात पोहोचला आणि सुमारे 2 तास चौकशी केली. यानंतर रात्री अकरा वाजता राज कुंद्रा याला अटक करण्यात आली. त्यानंतर पहाटे 4 वाजता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथून सकाळी त्याला मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात नेण्यात आले.
1- प्रदीप बक्षी हे व्यापारी राज कुंद्रा याचे नातेवाईक आहेत.
2- प्रदीप बक्षी यांच्या कंपनीचे नाव केनरीन प्रॉडक्शन हाऊस
3- राज कुंद्रा केनरीन प्रॉडक्शन हाऊसमधील बिझनेस पार्टनर
4- राज कुंद्रा केनरीनचा मालक असल्याचे बोलले जात आहे
5- भारतातील कंपनीचे प्रतिनिधी कुंद्रा याचा माजी पीए उमेश कामथ आहे
6- कंपनीमार्फत अश्लील चित्रपटांसाठी निधी
7- गेहाना वशिष्ठला केनरीनकडून अश्लील चित्रपटांचे काम मिळायचे
8- मेल आयडीद्वारे निर्मित चित्रपट पाठविले गेले
9- खात्यातून अश्लील चित्रपटांसाठी पैसे दिले गेले
10- केनरीनच्या माध्यमातून ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट पोस्ट करत असत