भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा?

सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Updated: Oct 28, 2019, 09:09 AM IST
भाजपचा 'एकला चलो रे'चा नारा? title=

मुंबई: शिवसेनेचा सध्याचा रागरंग पाहता विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने एकट्याने सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. २०१४ प्रमाणेच लवकरच सरकार स्थापना केली जाईल, अशी शक्यता आहे. त्यासाठी भाजप फ्लोअर टेस्टला जाण्याची तयारीही सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. शपथविधीसाठी ३१ तारखेचा मुहूर्त ठरल्याची माहिती आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ३० ऑक्टोबरला मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात ते मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. 

विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी व्हावी, असा आग्रह धरला आहे.

एकटं सरकार कसं स्थापन करतात तेच पाहू, शिवसेनेचा टोला

लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभेला समसमान जागावाटप होणार हे ठरले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांनी आमची अडचण समजून घ्यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा आपण अडचण समजून घेत विधानसभेच्या जागावाटपात कमीपणा घेतला. पण आता त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असतील तर आम्हाला त्या समजून घेता येणार नाहीत, असे उद्धव यांनी म्हटले होते.

सत्ता स्थापनेवरुन शिवसेना-भाजपचा एकमेकांना इशारा