मुंबई : बेस्टचे परिवहन विभागाचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी स्थायी समितीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या बँक खात्यातून कर्ज आणि व्याज फेडण्यासाठी एस्क्रो खातं तयार करण्यात आलंय.
या खात्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आलेत. कर्जाची रक्कम पहिल्या तारखेला नाही तर महिन्याच्या शेवटी बेस्ट उत्पन्नाचे पैसे जमा केले जातील. त्यामुळे महिनाभर बेस्टकडे पैसा खेळता राहील, आणि कर्मचाऱ्यांचे पगारही रखडणार नाहीत.