मुकेश - नीता अंबानींच्या घरी लगीनघाई! अनंत - राधिकाची लग्न पत्रिका आली समोर

Anant Ambani Radhika Merchant Wedding :  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडे लगीनघाई आहे. त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 13, 2024, 02:01 PM IST
मुकेश - नीता अंबानींच्या घरी लगीनघाई! अनंत - राधिकाची लग्न पत्रिका आली समोर  title=
Anant and Radhika Pre wedding celebrations of begins from Jamnagar and Nita Mukesh Ambani handwritten note surfaced on the internet

Anant Ambani Radhika Merchant Wedding : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानीचा साखरपुडा राधिका मर्चंट हिच्यासोबत गेल्या वर्षी 2023 मध्ये मोठ्या थाट्यामाट्यात संपन्न झाला होता. त्यानंतर या दोघांचे लग्न कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अंबानी कुटुंबातील कुठलाही सोहळा असो तो मोठ्या उत्साहात, ग्रँड असतो. त्यामुळे अंबानी कुटुंबातील सर्वात लहान मुलाचं लग्न म्हटल्यावर मुकेश आणि नीता अंबानी या लग्नात कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही. अशात अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनची तयारी सुरु झाली आहे. तेवढंच नाही तर या प्री वेडिंग सेलिब्रेशनची पत्रिका समोर आली आहे. तेवढंच नाही तर मुकेश आणि नीता अंबानी त्यांच्या हाताने लिहिलंल एक पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (Anant and Radhika Pre wedding celebrations of begins from Jamnagar and Nita Mukesh Ambani handwritten note surfaced on the internet)

इथे होणार प्री वेडिंग सोहळा!

विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगचं कार्ड पोस्ट केलं आहे. या पोस्टला लिहिलंय की, अनंत आणि राधिका प्री वेडिंग सेलिबेशन हे जामनगरमध्ये होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सेलिब्रेशन 1, 2 आणि 3 मार्च 2024 या तारखेला गुजरातमधील जामनगरमध्ये सोहळा होणार आहे. या कार्डसोबत मुकेश आणि नीता अंबानी यांच्या हाताने लिहिलेली एक चिठ्ठीही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, अनंतच्या नवीन अध्यायाची सुरुवात साजरी करण्याचं ठरवलंय. गुजरातमधील जामनगर हे त्यांच्यासाठी खूप खास ठिकाण आहे. 

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची विधी चुनरी विधी आणि गोल धानाच्या जुन्या गुजराती रीतिरिवाजांनी मोठ्या थाट्यात झाला. ज्यानंतर अंगठीचा सोहळा झाला.  प्रथेनुसार, अंबानी कुटुंबाने त्यांच्या घरी, अँटिलियामध्ये एंगेजमेंट पार्टीचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला बॉलिवूड जगतासह राजकीय मंडळीसोबत नावाजलेले बिझनेस मॅन असो खेळ जगतातील मंडळी असो असे अनेक मान्यवर पाहिला मिळाले.