शिवसेना आमदारांपाठोपाठ खासदारांचाही दबाव वाढला, म्हणाले भाजपसोबत चला...

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता इतर शिवसेनेचे नेते ही भाजपसोबत जाण्याची मागणी करत आहे.

Updated: Jun 22, 2022, 05:37 PM IST
शिवसेना आमदारांपाठोपाठ खासदारांचाही दबाव वाढला, म्हणाले भाजपसोबत चला... title=

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. महाविकासआघाडी सरकार संकटात आलं. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आता दबाव वाढला आहे.

कालच्या खासदारांच्या बैठकीत काही खासदारांनीही भाजपसोबत जाण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांचाही दबाव वाढला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी देखील हिदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा भाजपसोबत जाण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. 

भावना गवळी यांनी ही मुख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन केलं आहे. 'पक्षाच्या मावळ्यांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विनंती'. त्यांच्या भावना समजून योग्य निर्णय घ्या. खासदार भावना गवळीं यांनी उद्धव ठाकरेंना साकडं घातलं आहे.