चित्रपटाची निर्मिती करताना प्रेक्षकांची आवड लक्षात घ्यायला हवी- अजय देवगण

लोकप्रिय अभिनेता आणि निर्माता अजय देवगण याचे असे म्हणणे आहे की, ''लोकप्रियता ही प्रेक्षकांच्या प्रेमावर आणि विश्वासावरच अवलंबून आहे. म्हणून कोणताही चित्रपट करण्यापूर्वी प्रेक्षकांची आवड, अपेक्षा आणि त्यांचा सल्ला लक्षात घेण्याला मी प्राधान्य देतो. अलीकडेच ट्यूबलाईट आणि जब हॅरी मेट सेजल हे दोन बहूचर्चित चित्रपट प्रेक्षकांना फारसे भावले नाहीत.''अजय देवगणचा आगामी चित्रपट 'बादशाहो' १ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. त्यांचे अपयश लक्षात घेऊन अजय त्यांच्या आगामी  'बादशाहो' हा चित्रपट बनवताना कोणती काळजी घेतील ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 8, 2017, 11:00 AM IST
चित्रपटाची निर्मिती करताना प्रेक्षकांची आवड लक्षात घ्यायला हवी- अजय देवगण  title=
अजय देवगणचा आगामी चित्रपट 'बादशाहो' १ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. (फाईल फोटो)

मुंबई: लोकप्रिय अभिनेता आणि निर्माता अजय देवगण याचे असे म्हणणे आहे की, ''लोकप्रियता ही प्रेक्षकांच्या प्रेमावर आणि विश्वासावरच अवलंबून आहे. म्हणून कोणताही चित्रपट करण्यापूर्वी प्रेक्षकांची आवड, अपेक्षा आणि त्यांचा सल्ला लक्षात घेण्याला मी प्राधान्य देतो.'' अजय देवगणचा आगामी चित्रपट 'बादशाहो' १ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. अलीकडेच 'ट्यूबलाईट' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे दोन बहूचर्चित चित्रपट प्रेक्षकांना फारसे भावले नाहीत. त्यांचे अपयश लक्षात घेऊन अजय त्यांच्या आगामी 'बादशाहो' हा चित्रपट बनवताना कोणती काळजी घेतली ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

 

यावर अजय बोलले, ''प्रेक्षकच कोणत्याही अभिनेत्याला स्टार बनवतात. त्यामुळे त्यांच्या मतांचा आदर केला पाहिजे. प्रेक्षक आमच्यावर प्रचंड प्रेम करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या काही अपेक्षा देखील असतात. म्हणून मला असे वाटते की, त्यांचे विचार लक्षात घ्यायला हवेत आणि त्यांच्या मतांचा आदर करायला हवा.'' अजय देवगणचा आगामी चित्रपट 'बादशाहो' १ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त इलियाना डिक्रूज, इमरान हाश्मी आणि ईशा गुप्ता हे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलान लूथ्रिया यांनी केले असून भूषण कुमार यांची निमिर्ती आहे.