Zilla Parishad Election : अनिल देशमुख यांना धक्का, काँग्रेसची मुसंडी तर भाजपची आघाडी

Zilla Parishad Election Result 2021 : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत धुळ्यात भाजप आघाडीवर आहे. तर नरखेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. 

Updated: Oct 6, 2021, 12:54 PM IST
Zilla Parishad Election : अनिल देशमुख यांना धक्का, काँग्रेसची मुसंडी तर भाजपची आघाडी  title=

मुंबई, पालघर, नागपूर, अकोला : Zilla Parishad Election Result 2021 : जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत धुळ्यात भाजप आघाडीवर आहे. तर नरखेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. नागपूरमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. दोन महत्त्वाच्या जागा भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत.   नगरखेडा पंचायत समिती आणि पारडसिंग जिल्हा परिषद या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. आता दोन्ही जागा भाजपने आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. विदर्भात काँग्रेसची मुसंडी दिसून येत आहे. अद्याप संपूर्ण निकाल हाती यायचा आहे.

ZP Election Result 2021 Update : पाहा अपडेट निकाल, कोणी मारली बाजी?

नागपूरमधील नरखेड पंचायत समिती भाजपच्या ताब्यात गेली आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. नागपूरमधल्या डोंगरगाव पंचायत समितीत  काँग्रेसच्या उज्वला खडसे विजयी झाल्या झाल्या आहेत.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची कन्या विजयी

- धुळे जिल्हा परिषदेत भाजप आघाडीवर 

- भाजपचे 5 उमेदवार विजयी, शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी
- धुळे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी
- धुळे जिल्हा परिषद 15 पैकी 8 जागांचा निकाल
- शिरपूर तालुक्यातील सर्व सहा गण भाजपाचे वर्चस्व..
- आमदार अमरीश पटेल यांनी आपलं वर्चस्व कायम राखत जिल्हा परिषद लामकानी गावातील भाजपाचे उमेदवार धरती देवरे सुमारे चार हजार 96 मतांनी विजयी 

नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीची पीछेहाट

नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सुंदोपसुंदीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत पीछेहाट झाली. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसमुळे हा फटका बसल्याचे आरोप केलेत. नंदुरबारमधून भाजपाच्या कोलदा गटात भाजपाच्या सुप्रिया गावित विजयी झाल्यात. विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत.. 

- नंदुरबारमध्ये 11 जागांपैकी 8 जागांचा निकाल जाहीर
- नंदुरबार जि.प भाजप 3, काँग्रेस 3 जागांवर विजयी
- शिवसेना 1 तर राष्ट्रवादी 1 जागेवर विजयी
- नंदुरबारच्या खोंडामळी गटातून भाजपाचे शांताराम पाटील अवघ्या 86 मतांनी विजयी झालेयत...शिवसेना उमेदवाराचा 86 मतांनी पराभव झाला आहे.
-नंदुरबार जि.परिषदेत काँग्रेसचे रेहानाबेन मक्रणी विजयी

वंचित बहुजन आघाडीचा झेंडा

अकोल्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जवळपास लागलेत. यात वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक सहा जागा मिळवल्या आहेत तर शिवसेनेने एक, राष्ट्रवादीने एक, भाजपने एक आणि एक अपक्ष उमेदवाराने विजयी मिळवला आहे. पंचायत समितीत सुद्धा वंचित बहुजन आघाडी ही आघाडीवर आहे.. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला अकोल्यात सुरुवात केली आहे आहे.

अकोल्यात पोटनिवडणुकांवर वंचितचं वर्चस्व
वंचित बहुजनचा अकोल्यात 6 जागांवर विजय
शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपला प्रत्येकी 1 जागा
बंडखोर अपक्ष उमेदवार एका जागेवर विजयी

वंचित ६
बंडखोर अपक्ष- १
राष्ट्रवादी १
शिवसेना १
भाजप १ 

पालघर जिल्हा परिषदेत कोणाची बाजी? 

पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या एका जागी शिवसेनेचा विजय झाला आहे. शिवसेनेच्या विनया विकास पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांचा सहा हजार दोनशे मतांनी विजय झाला आहे. विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, हा सगळ्यांचा विजय आहे.

पालघर जिल्हा परिषद कासा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लतिका बालशी विजयी झाल्या तर सरावली जि.प.गटातून भाजपचे सुनील माच्छि विजयी झालेत. आलोंडे गटात भाजपाचे उमेदवार संदीप पावडे 802 मतांनी विजयी झालेत. तर पालघर जि.प बोर्डीमधून भाजप उमेदवार विजयी
- बोर्डीमधून भाजपच्या ज्योती पाटील विजयी
- पालघर जिल्हा परिषद  गट - नडोरे देवखोप शिवसेना उमेदवार निता पाटील विजयी
- पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना एका जागेवर विजयी
- शिवसेनेच्या उमेदवार विनया विकास पाटील 6200 मतांनी विजयी 

प्रविण दरेकर यांची टीका

- महाविकास आघाडीला जनता नाकारत आहे- दरेकर
- नंदुरबार, नागपूर, धुळ्यात भाजपला अपेक्षित यश- दरेकर
- महाविकास आघाडीवर शेतकरी वर्ग नाराज- दरेकर
- शेतकरी वर्गातील नाराजी मतातून दिसेल- प्रवीण दरेकर

या जिल्हा परिषदेत भाजप आघाडीवर   

धुळे जिल्हा परिषदेत भाजप आघाडीवर 
गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या कन्या धरती देवरे धुळ्यातून विजयी झाल्या आहेत.
नरखेडमध्ये अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. येथे भाजप आघाडीवर असून नंदुरबार-कोलदा गटात भाजपच्या सुप्रिया गावित विजयी झाल्या आहेत. नंदुरबार- के. सी. पाडवींची बहीण गीता पाडवी विजयी झाल्या आहेत.