पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळील बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर असणारी रेती यामुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय.
अवेंजर मोटार सायकलवरून ही चालक महिला जात असताना खराब रस्त्यामुळे गाडी अचानक स्लिप झाली आणि मागून येणारा ट्रेलर तिच्यावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे रस्त्याशेजारील गावकऱ्यांनी रास्ता रोको करत ठेकेदार आणि प्रशासनाचा निषेध केला. २००७ पासून मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम अद्यापही सुरूच आहे.
प्रशासनाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे अजून किती निष्पापांना आपला जीव गमवावा लागणार आहे आणि आतातरी प्रशासनाला जाग येते का, ते पहावं लागणार आहे.