सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे आश्चर्याचा धक्का देणारे असतात. दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक भलामोठा महाकाय अजगर खिडकीला लटकलेला दिसत आहे. यादरम्यान दोन व्यक्ती या अजगराला पकडण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती घरातून तर दुसऱी व्यक्ती खिडकीच्या बाहेरील जागेवर उभं राहून प्रयत्न करत होती. दरम्यान या अजगराचा आकार पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. हा व्हिडीओ ठाण्यातील असल्याचा दावा केला जात आहे. पण त्याची पुष्टी झालेली नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडीओत अजगर एका चाळीतील खिडकीच्या बाहेर लटकताना दिसत आहे. जवळपास 10 फुटांचा हा अजगर अर्धा खिडकीतील ग्रीलच्या आतमध्ये असतो. आत उभ्या व्यक्तीने त्याचं तोंड पकडलेलं व्हिडीओत दिसत आहे. तर दुसरीकडे एक तरुण खिडकीच्या बाहेर उभा राहून त्या अजगराची शेपटी पकडून उभा असल्याचं दिसत आहे. ज्याप्रकारे दोघं अजिबातन घाबरता त्या अजगराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, त्यावरुन ते सर्पमित्र असावेत असं दिसत आहे.
A huge snake was spotted at a Thane Building, it was rescued by two brave persons, rescue video. . #thane #mumbai pic.twitter.com/j2ZWrs9mR9
— Sneha (@QueenofThane) September 25, 2023
दरम्यान, दोघे अजगराला पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच आतमधील उभ्या व्यक्तीच्या हातातून तो सटकतो आणि थेट खाली जाऊन पडतो.
हा व्हिडीओ ठाण्याच्या नौपाडामधील असल्याचा दावा केला जात आहे. पण याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसंच ठाण्यातील नागरिकाने बर्मामधील अजगराला घरात पाळलं होतं असा संशय आहे. वनविभागाने अद्याप याबद्दल अधिकृतपणे काही माहिती दिलेली नाही. पण हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.