खोपोली : केंद्रीय अवजड व उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोली- पाली मार्गावर अपघात झाला. या अपघात गिते यांच्या डोक्याला मार बसलाय. त्यांना तात्काळ येथील शासकीय विश्रामगृहावर हलविण्यात आले. त्यांनी तेथे काही काळ विश्रांती घेतली.
खोपोलीकडून पालीकडे जाताना पाली जवळ घडला अपघात. गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीला दुचाकी स्वार आडवा आल्याने अचानक पुढच्या गाडीने ब्रेक लावल्याने गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हँनने धडक दिल्याने हा अपघात झाला.
मंत्री अनंत गिते हे आज रायगड दौऱ्यावर आले होते. ते पालीकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील पुढच्या पायलट गाडीने अचनाक ब्रेक दाबला. त्यामुळे ज्या गाडीत मंत्री गिते होते, त्या गाडीची धडक पुढच्या गाडीला बसली. तसेच मागून येणारी पायलट गाडीही गिते असणाऱ्या गाडीवर आदळली. गिते यांची गाडी दोन गाड्यांच्या मध्ये चेपली गेल्याने हा अपघात झाला.
या अपघातात गिते यांच्या डोक्याला मार बसला. त्यांना किरकोळ दुखापत झाली. गिते आता सुरखरुप असल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ पाली येथील विश्रामगृहावर हलविण्यात आले. तेथे त्यांना थांबविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले.