मुंबई : राज्याची कोरोना रुग्णसंख्या समोर आली आहे. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णसंख्येत चढ उतार हा कायम आहे. पण चिंताजनक बाब म्हणजे आज कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा हा कोरोना बाधितांपेक्षा कमी आहे. आज (11 जुलै) महाराष्ट्रात एकूण 8 हजार 535 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (today 11 july 2021 in Maharashtra found 8 thousand 535 corona cases)
Maharashtra reports 8,535 new #COVID19 cases, 6,013 recoveries and 156 deaths in the last 24 hours.
Total cases 61,57,799
Total recoveries 59,12,479
Death toll 1,25,878Active cases 1,16,165 pic.twitter.com/RgF3r8zOVK
— ANI (@ANI) July 11, 2021
किती जणांना डिस्चार्ज?
आज राज्यातील एकूण 6 हजार 13 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 59 लाख 12 हजार 479 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.02% इतका झालाय.
दिवसात किती मृत्यू?
कोरोनामुळे दिवसभरात आज 10 जुलैच्या तुलनेत काही प्रमाणात कमी मृत्यू झाले आहेत. दिवसभरात 156 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू दर हा 2.04 % इतका आहे. सध्या राज्यात एकूण 5 लाख 96 हजार 279 व्यक्ती होम क्वारटाईन आहेत. तर 4 हजार 772 व्यक्ती संस्थातमक विलिगिकरणात आहेत. तसेच ताज्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण 1 लाख 16 हजार 165 सक्रीय रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या
मुंबईतीला कोरोना पॉझिटिव्ह आकडा हा काही दिवसांपर्यंत 500 च्या खाली होता. या आकड्यात आता सातत्याने किंचीतशी वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आज 555 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 666 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 7 लाख 23हजार 76 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 96 % इतका आहे. मुंबईत एकूण 7 हजार 354 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना दुप्पटीचा दर हा 928 दिवसांवर जाऊन पोहचलाय.
#CoronavirusUpdates
११ जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ५५५
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ६६६
बरे झालेले एकूण रुग्ण - ७०२३७६
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९६%एकूण सक्रिय रुग्ण- ७३५४
दुप्पटीचा दर- ९२८ दिवस
कोविड वाढीचा दर ( ४ जुलै ते १० जुलै)- ०.०७ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 11, 2021
कोल्हापुरात सर्वाधिक रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात सातत्याने सर्वाधिक रुग्णांचं निदान होत आहे. हा दररोज वाढणारा आकडा राज्यासाठी आणि आरोग्य विभागासाठी चिंताजनक ठरत आहे. दिवसभरात कोल्हापुरात एकूण 1 हजार 146 रुग्णांची नोंद झाली आहे.