महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून तालिबानीचं वास्तव्य; शस्त्रांसह फोटो व्हायरल

अफगाणिस्तानात डिपोर्ट केलेला तालिबानी वेशात; शस्त्रांसह फोटो व्हायरल 

Updated: Aug 20, 2021, 09:54 AM IST
महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून तालिबानीचं वास्तव्य; शस्त्रांसह फोटो व्हायरल  title=

नागपूर : नागपुरात 10 वर्षे वास्तव्य केलेल्या एका अफगाणी नागरिकाचा शस्त्रांसह फोटो व्हायरल झाल्याने नागपुरात खळबळ उडालीय. हा अफगाणी नागरिक टुरिस्ट व्हीसावर भारतात आला होता. मात्र त्याचा व्हीजा संपल्यावरही बेकायदेशीररित्या भारतातच होता. याबाबत नागपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 2 महिन्यांपूर्वी त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याची कसून चौकशी केली.

मात्र त्याच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नसल्यानं किंवा त्याचा कुठल्याही बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभाग नसल्याचं पोलिसांना चौकशीत आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी परत अफगाणिस्तान मध्ये पाठवून दिले होते. मात्र, आता त्याचा नागपुरातील आणि अफगाणिस्तानमध्ये शस्त्रासह असलेला फोटो व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान अफगाणिस्तानमध्ये वादग्रस्त परिस्थितीनंतर नागपुरात अफगाणी नागरिकाचा शस्त्रांसह फोटो असणं फार धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. 17 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. त्यानंतर सर्वच देश सतर्क झाले आहेत. शिवाय तेथील नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत.