बायकोशी पटत नव्हतं म्हणून आधी सासूला संपवलं अन् मग उचललं धक्कादायक पाऊल

 सासूला संपवत जावयाने केलं अंगावर काटा आणणारं कृत्य! 

Updated: Aug 25, 2022, 06:54 PM IST
बायकोशी पटत नव्हतं म्हणून आधी सासूला संपवलं अन् मग उचललं धक्कादायक पाऊल title=

Crime News : गैरसमजांमुळे अनेक चांगली नाती तुटताना आपण पाहतो. नवरा बायकोची भांडणे होत असतात मात्र काहीवेळा या भांडणाचा शेवट खूप धोकादायक असतो. असाच धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामध्ये समोर आला आहे. जावयाने त्याच्या सासूला मारत स्वत:ला पेटवून घेत संपवलं आहे. ही घटना लातूरमधील वीर-हणमंतवाडी गावातील आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
उद्गीरचा असणाऱ्या जावई रजनीकांत वेदपाठकचं त्याच्या पत्नीसोबत पटत नव्हतं. दोघांमध्ये यावरून अनेकवेळा वाद होत होते. दोघांना 8 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा आहे. रजनीकांत बायकोसह मुलांनाही मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मुलांना घेऊन लातूरला म्हणजेच माहेर तिच्या घरी जाते. 

काही वर्षांपासून त्याची पत्नी लातूरलाच राहत होती. रजनीकांतने बऱ्याचदा पत्नीला माघारी बोलावलं होतं. तिकडे जाऊन पुन्हा मारहाण, भांडणामुळे ती काही जात नव्हती. मंगळवारी 23 ऑगस्टला रजनीकांत लातूरला पत्नीच्या माहेरी जातो. त्याच्याकडे धारदार शस्त्र असतं, घराच्या बाहेर खेळणाऱ्या त्याच्याच मुलावर तो वार करत गंभीर जखमी करतो. त्यावेळी घरामध्ये रजनीकांतची पत्नी आणि तिची मुलगी नसल्यामुळे त्या वाचतात. 

दरम्यान, शेजारचे गंभीर झालेल्या लहान मुलाला रूग्णालयात नेतात आणि दाखल करतात. घरातून धुराचे लोट येऊ लागतात, लोक येतात पाहतात तर त्यांनाही धक्का बसतो. रजनीकांत वेदपाठक स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करतो. या घटनेमागे नेमकं काय कारण होतं?, याचा प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.