भाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

युवक काँग्रेसने राज्यात ठिकठिकाणी योगासनाच्या माध्यमातून भाजप सरकारचा निषेध नोंदवलाय.

Updated: Oct 31, 2018, 07:18 PM IST
भाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन title=

सोलापूर / नाशिक : भाजप सरकारच्या चौथ्या वर्षपूर्ती निमित्तानं युवक काँग्रेसने राज्यात ठिकठिकाणी योगासनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवलाय. नाशिक युवक काँग्रेसनं निषेधासन.. धिंड भाजपच्या चार वर्षाची.. असे या आंदोलनाचे नाव ठेवण्यात आलं होतं. यामध्ये नाशिक युवक काँग्रेसच्यावतीने विविध योगासनं करत हे आंदोलन करण्यात आलं.

हॅश टॅग देऊन फसवणीसान, बेरोजगारासन, ट्रोलासन, धमकी सन, मौनासन, क्लिनचिटासन, राफेलासन, गाजरासन, अभ्यासान, भक्तासन, महागाईसन, वाचाळसन अशी 12 आसनं करून अभिनव आंदोलन करत भाजप सरकारचा निषेध केलाय.  तर दुसरीकडे सोलापूरमध्येही काँग्रेसकडून निषेधासन करण्यात आलं. सोलापूरच्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी योग व्यायामाचं विडंबन करून आंदोलन केलं.