सेनेचा पुन्हा एकदा घुमजाव... भाजपसोबत हातमिळवणी!

आता गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला सेना-भाजपचा वाद संपुष्टात आल्यानं पालिकेचा कारभार चांगला आणि नेटका करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितलंय. 

Updated: May 17, 2018, 09:40 PM IST
सेनेचा पुन्हा एकदा घुमजाव... भाजपसोबत हातमिळवणी! title=

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत एकमेकांच्या सतत विरोधात असलेल्या सेना-भाजपनं विरोधकांना अंधारात ठेवून हातमिळवणी केलीय. भाजपनं विषय समितीच्या सभापती पदाच्या चार जागा तर शिवसेनेनं तीन जागा आपल्या पदरात पाडून घेतल्यात.. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपाने निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने या जागा बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केली.. आता गेल्या वर्षभरापासून सुरु असलेला सेना-भाजपचा वाद संपुष्टात आल्यानं पालिकेचा कारभार चांगला आणि नेटका करणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितलंय. 

सोलापूर महानगरपालिकेच्या सात विषय समिती सभापती निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरण्यात आले़ स्थापत्य समितीसाठी गुरूशांत धुत्तरगांवकर (शिवसेना), शहर सुधारणा समितीसाठी शालन शिंदे (भाजप), वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीसाठी वरलक्ष्मी पुरूड, उद्यान, (भाजप), मंड्या समितीसाठी कुमूद अंकाराम (शिवसेना), विधी समितीसाठी विनायक कोंड्याल, कामगार व समाजकल्याण समितीसाठी रवी कैय्यावाले (भाजप), आणि महिला बालकल्याणसाठी रामेश्वरी बिर्रू (भाजप) यांचे एकमेव अर्ज दाखल झाले होते ,विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सभागृहनेते संजय कोळी यांच्याशी चर्चा करून एक होऊन तीन  समित्या पदरात पाडून घेतल्या. 

गत वर्षीप्रमाणे सर्व विरोधक एक होऊन काही समित्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे किसन जाधव, बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी केला. त्यांच्या प्रयत्नाला एमआयएमचे तौफिक शेख यांनी प्रतिसाद दिला नाही तर विरोधी पक्षनेते कोठे यांनी 'सकाळी पाहू...' म्हणून वेळ मारून नेली. बुधवारी सकाळी कोठे भाजपसोबत आहेत हे कळल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाने निवडणुकीवर बहिष्कार घातला.