ट्रकमध्ये कोंबलेल्या ३० जनावरांचा होरपळून मृत्यू

आगीत ट्रक पूर्णतः बेचिराख झाला तर ट्रकमध्ये कोंबलेल्या ३० गाई  आणि बैलांचा होरपळून मृत्यू झाला. 

Updated: May 17, 2018, 09:14 PM IST

यवतमाळ : यवतमाळमध्ये ३० जनावरांचा होरपळून मृत्यू झालाय..  पिंपळखुटी आरटीओ चेक पोस्ट जवळ जनावरांची तस्करी करणारा ट्रक अपघातग्रस्त होऊन पेटला. या पेटत्या ट्रकमध्ये होरपळून ३० जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  मध्यप्रदेशातून गाय आणि बैलांना घेऊन दोन ट्रक भरधाव वेगानं तेलंगणाकडे निघाले होते. त्यातील एक ट्रक आरटीओ चेक पोस्टचे फायबर आणि सिमेंटचे बॅरिकेट तोडून पलटी झाला. या अपघातात ट्रकनं पेट घेतला.

मृत जनावरं जमिनीत गाडली

लागलेल्या आगीत ट्रक पूर्णतः बेचिराख झाला तर ट्रकमध्ये कोंबलेल्या ३० गाई  आणि बैलांचा होरपळून मृत्यू झाला. पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रात्रीतूनच मृत जनावरांना जमिनीत गाडलं... तसंच दुसरा ट्रक ताब्यात घेऊन त्यातील ३५ जनावरांची सुटका केली. 

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक मार्गांवरून गोवंश तस्करी होत असून वाहतूक पोलीस आणि आरटीओतील भ्रष्ट यंत्रणा यात गुंतली असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. या दुर्घटनेमुळे या आरोपांना एकप्रकारे दुजोराच मिळालाय.