शरद पवार - उदयनराजे भोसले यांचा एकाच गाडीतून प्रवास

खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान, उदयनराजे यांनी अनेकवेळा राष्ट्रवादीवर जाहीरपणे तोंडसुख घेतले होते. तसेच राष्ट्रवादीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.

Updated: Oct 4, 2017, 12:18 PM IST
शरद पवार - उदयनराजे भोसले यांचा एकाच गाडीतून प्रवास title=

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान, उदयनराजे यांनी अनेकवेळा राष्ट्रवादीवर जाहीरपणे तोंडसुख घेतले होते. तसेच राष्ट्रवादीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.

काल मुंबईत उदयनराजे यांनी पवार यांनी भेट घेतली होती. यावेळी चर्चा केली. मात्र, चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. पुण्यापासून पवार आणि उदयनराजे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. पुणे ते सातारा असा प्रवास चक्क शेजारी बसून केला. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये  आणि  उदयनराजे भोसले यांच्यात निखाराही जात नसताना पवार-भोसले जवळीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

मुंबईमध्ये शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यात झालेली बैठकीने राष्ट्रवादीमधील  उदयनराजे विरोधक नेत्यांना धक्का बसला. आता या एकत्रित प्रवासाची चर्चा  आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात आणि राज्यात सुरु झाली आहे.