कॅनडाच्या मदतीने महाराष्ट्र करणार पंढरपूरचा विकास

अवघा महाराष्ट्र आणि जगभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले अध्यात्मिक पंढरपूर लवकरच जगाच्या नकाशावर सर्वोच्च ठरणार आहे. 

Updated: Oct 4, 2017, 01:02 PM IST
कॅनडाच्या मदतीने महाराष्ट्र करणार पंढरपूरचा विकास title=

सोलापूर : अवघा महाराष्ट्र आणि जगभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले अध्यात्मिक पंढरपूर लवकरच जगाच्या नकाशावर सर्वोच्च ठरणार आहे. 

पंढरपूरला जगाच्या नकाशावर सर्वोच्च ठरविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्न करत आहेत. त्यासाठी कॅनडा  सरकारच्या मदतीतून पंढरपूरचा विकास करून देशातील पहिले सुंदर तीर्थक्षेत्र करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी दिली आहे.ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते.

कॅनडाचे भारतातील जनरल कौन्सील जॉर्डन रिवी आणि दोन कॅनेडियन अधिकारी यांचे पथक पंढरपूर येथे दाखल झाले. या पथकाने विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल दर्शन घेतले. तसेच, मंदिर परिसर, चंद्रभागा नदी आणि शहराच्या काही भागांची पाहणीही केली.