Sharad Pawar on Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. भाजपकडून अनेक राज्यात फोडाफोडी करुन राज्ये आपल्या हातात घेतली. फोडाफोडी आणि खोक्याचं राजकारण कर्नाटकच्या लोकांना आवडलेले नाही, असा भाजपवर हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चढवला. कर्नाटकचं चित्र देशभर दिसेल, असा दावा पवार यांनी यावेळी केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पवार यांनी कर्नाटकमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही शरद पवार यांनी टार्गेट केले. अलिकडच्या काळात भाजपकडून इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यात आमदार फोडून सत्ता आपल्याकडे घेतली आहे. त्यासाठी सत्तेचा वापर करणे हे सूत्र वापरलं आहे. कर्नाटकातही त्यांनी हेच केले. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदे यांनी केले, तेच तिथे झाले. तेच मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या बाबतीत केले. गोव्यातही भाजपला बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतले. ही एक नवीन पद्धत साधन संपत्तीचा वापर करुन राबवली जात आहे. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसले आहे, असे पवार म्हणाले. तसेच कर्नाटकप्रमाणे देशातही भाजपला धडा शिकवला जाईल असं पवार म्हणाले. बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे, भाजपचा सपशेल पराभव झालाय, असं पवार म्हणाले.
कर्नाटकमध्ये आम्ही सात उमेदवार उभे केले. आतापर्यंत आकडे त्यामध्ये आमचा उमेदवार आता दुसरा क्रमांकावर आहे.अंतर सहा हजार आहे यश मिळेल वाटत आहे. एखाद्या राज्याची एन्ट्री करायच्यादृष्टीने प्रयत्न केले. आमचे खरे लक्ष होते. मात्र, कर्नाटकमध्ये भाजप पराभव होईल. सरकार असेल तरी देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी सभा कार्यक्रम केले तरी तिथल्या जनतेचा रोष व्यक्त होईल, अशी खात्री होती. अलीकडे केंद्र सरकार भाजपमध्ये राज्य नाही तिथे आमदार फोडून राज्य घ्यायचं प्रयत्न करतात. कर्नाटकमध्ये सरकार होते ते सरकार फोडून घालवले. पण फोडाफोडी खोक्यांचे राजकारण लोकांना मान्य नाही हे आज स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे अभिनंदन करतो. ही प्रक्रिया देशात होईल धडा शिकवला, असे ते म्हणाले.
भाजप केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये नाही, पंजाब, दिल्लीत नाही. याचा अर्थ बहुसंख्य राज्यात भाजप सत्ते बाहेर जात आहे. आज झालेले मतदान यश अपयश समजू शकतो. कर्नाटक भाजप कल 65 ठिकाणी काँग्रेस 133 आहे. भाजपपेक्षा काँग्रेस दुप्पट जागी आहे भाजप सपशेल पराभव आहे. जनतेने चांगलीच दखल घेतली. त्याचे मुख्य कारण सस्तेचा गैरवापर, आम्ही लोक फोडून राज्य करु शकतो याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. 2024 देशात निवडणूक होतील. त्यावेळी चित्र काय येईल याचा अंदाज यातून करु शकतो. लोकांनी एवढी काळजी घेतली. फोडाफोडी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर जनतेने धडा शिकवला. फोडाफोडी करणारी शक्ती आहे त्यांना ताकद दिली नाही, असे पवार म्हणाले.
निवडणुकीत धर्म, जात एकदा वापर केला एकदा फायदा होईल. बजरंगबली विषय काढण्याचा गरज नव्हती. आम्ही सेलक्युलारिझम शपथ घेतली तेव्हा बजरंगबली घोषणा दिली, हे लोकांना योग्य वाटत नाही. फोडाफोडी राजकारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, कर्नाटक जनतेने निकाल दिलाय फोडाफोडी होऊ नये, असे असा निकाल आहे. दरम्यान, आम्ही महाविकास आघाडीची बैठक बोलवली आहे. आम्ही एकत्र बसून आखणी करणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्याशी काल बोललो आहे. काँग्रेस नेते येतील आणि आमची येत्या दोन तीन दिवसांत महाविकास आघाडीची बैठक घेणार आहे, असे पवार म्हणाले.