Sharad Pawar Visit Markadwadi: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. विधानसभा निकालात महायुतीला भरघोस यश मिळाले तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अपयश आले. महायुतीला मिळालेल्या मतदानावरुन शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान शरद पवार अॅक्शनमोडमध्ये पाहायला मिळत आहेत.
मोठी राज्य आहेत तिथे भाजप आणि छोटी राज्य आहेत तिथे आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटतं. अजित दादा गटाची मत 58 लाख मत असून त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. काँग्रेसला 80 लाख मत असताना त्यांचे 15 जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी उद्या मारकडवाडीत जाणार असल्याची महत्वाची घोषणा केलीय.ग्रामास्थानी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करुन पाहिलं तर बिघडलं कुठे, ग्रामस्थांवर बंदी घालण्याचं कारण काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी SP पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी EVMविरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत मारकडवाडीतील ग्रामस्थांना भेटून, त्यांच्याशी पवार संवाद साधणार आहेत. उद्या सकाळी साडे दहा वाजता शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाचा दौरा करणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला आम्ही एकत्र सामोरे जाणार. मी 14 निवडणुका लढलो कधी पराभव पाहिला नाही. आज लोक अस्वस्थ आहेत. महायुतीच्या विजयानंतरही लोकांमध्ये उत्साह का दिसत नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला.