दरेकर, 'महिलांची माफी मागा अन्यथा थोबाड आणि गाल रंगवू शकतो'

भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. 

Updated: Sep 14, 2021, 06:54 AM IST
दरेकर, 'महिलांची माफी मागा अन्यथा थोबाड आणि गाल रंगवू शकतो' title=
Pic Courtesy : twitter

मुंबई : भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादीची काँग्रेसच्या महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना स्पष्ट इशारा दिला आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असे ट्विट चाकणकर यांनी केले आहे. (Rupali Chakankar warns Pravin Darekar over controversial statement)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) गरिबांकडे पाहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष असल्याचा हल्लाबोल भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला होता. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीका दरेकर यांनी केली होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. 

दरम्यान, 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांचा प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला होता. यावरुन राष्ट्रवादी महिला प्रदेशने जोरदार प्रतिहल्लाबोल केला आहे. प्रविण दरेकर तुम्ही सातत्याने महिलांबद्दल बोलत आहात. सापत्न वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकतेय, ती आपल्या वैचारिकतेची दरिद्रता दाखवतेय. ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असे चाकणकर म्हणाल्या.

आपल्या पक्षाच्या काही नेत्या आहेत. बाहेर फिरताना आपण किती महिलांच्या कैवारी आहोत हे दाखवून देत आहेत. आज मला त्यांची किव येत आहे. अशा महिला ज्या पक्षात काम करत आहेत, त्या पक्षाचा हा विचार आहे. तुमच्या बोलण्यावरुन तुमची संस्कृति काय आहे ते दिसून येत आहे. प्रविण दरेकर ज्या प्रकराचे आपण वक्तव्य केलंय त्याबद्दल आपण महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असे थेट इशारा चाकणकर यांनी दिला आहे.