मारकडवाडीचा रणसंग्राम, EVM आणि बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने

मारकडवाडीत ईव्हीएम की बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 9, 2024, 08:31 PM IST
मारकडवाडीचा रणसंग्राम, EVM आणि बॅलेट पेपरवरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने title=
Markadwadi Voting : मारकडवाडीत ईव्हीएम की बॅलेट पेपर यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांनी ईव्हीएम विरोधात रान पेटवलं असताना आता सत्ताधारीही त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी मारकवाडीत जाणार आहेत. सत्ताधारीही मारकडवाडीत जाऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. 
 
शरद पवार यांनी मारकडवाडीत जाऊन ईव्हीएमवर मतदान नको असं जनतेचं मत असल्याचं म्हटलंय. तर त्यांच्या आरोपांना आता मारकडवाडीत जाऊन  भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उत्तर देणार आहेत. दोन्ही नेते मंगळवारी मारकडवाडीत जाऊन ईव्हीम समर्थनार्थ भूमिका मांडणार आहेत.
 
लेकीचा अधी राजीनामा घ्यावा मग इतरांना बोलावं
 
मारकडवाडीतील ग्रामस्थांनीच आम्हाला बोलावल्याचा दावा  गोपीचंद पडळकरांनी केला आहे. तर  EVMवरून शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलंय. आधी शरद पवार यांनी मुलीचा राजीनामा घ्यावा आणि त्यानंतर ईव्हीएमवर बोलावं असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. 
 
दरम्यान, या सर्व प्रकरणावर स्थानिक आमदार उत्तम जानकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, बॅलेट पेपरवर मतदान होणार असेल तर राजीनामा देण्यास मी तयार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 
 
EVM विरोधात ठराव करणारं देशातील पहिलं गाव
 
साताऱ्याच्या कराड तालुक्यातील कोळेवाडी हे EVM विरोधात ठराव करणारं देशातील पहिलं गाव ठरलंय. मारकडवाडीतून EVM विरोधात पडलेल्या ठिणगीचा वणवा हळूहळू राज्यातील इतरही गावांमध्ये पसरताना पाहायला मिळतोय.
 
राहुल गांधी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष
 
 अशातच आता राहुल गांधीही मारकडवाडीत जाऊन आपली भूमिका मांडणार आहेत.  त्यामुळे  ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवलं असताना आता सत्ताधारीही त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार आहे. त्यामुळे मारकडवाडीतील राजकीय रणसंग्राम आणखी तीव्र होणार ऐवढं मात्र नक्की.