राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार 'ही' चाल

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रातील 6 जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 30, 2024, 09:45 AM IST
राज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार 'ही' चाल title=
Rajya Sabha Election BJP master plan for 5 Maharashtra Rajya Sabha seats whip This move will be used to confuse the Thackeray group

Maharashtra State Election : निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 56 जागांसाठी 16 राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात 6 जागांचं भवितव्य ठरणार आहे. 6 पैकी 5 जागा काबिज करण्यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात येतोय. तर महाविकास आघाडीला दोन जागांसाठी मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान हे खुल असल्याने यात राज्यात पक्षादेश म्हणजे व्हीप महत्त्वाचा ठरणार आहे. महाआघाडीत फूट म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे झाल्यानंतर ही राज्यात पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचं याकडे लक्ष लागलं आहे. (Rajya Sabha Election BJP master plan for 5 Maharashtra Rajya Sabha seats whip This move will be used to confuse the Thackeray group)

'या' जागांसाठी होणार निवडणूक

1) प्रकाश जावडेकर
2) व्ही मुरलीधरन
3) नारायण राणे, भाजप 
4) कुमार कतेकर, काँग्रेस 
5) वंदना चव्हाण, राष्ट्रवादी, 
6) अनिल देसाई, शिवसेना (ठाकरे गट)

महाराष्ट्राशिवाय 'या' राज्यात राज्यसभा निवडणूक!

महाराष्ट्रासोबतच एकूण 15 राज्यांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. यात आंध्र प्रदेश, ओडिसा, राजस्थानच्या प्रत्येकी 3 जागा, महाराष्ट्र आणि बिहारच्या प्रत्येकी 6 जागा, गुजरात, कर्नाटकच्या प्रत्येकी 4 जागा, छत्तीसगढ, हरयाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडची प्रत्येकी 1 जागा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी 5 जागा, तेलंगणाच्या 3 जगा, उत्तर प्रदेशच्या 10 जागांसाठी मतदान होणार आहे.