हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या जोरदार चर्चेत आहे. पुण्यात (Pune News) एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलाताना गौतमी पाटील (Gautami Patil Video) हिचा मोबाईलवर व्हिडीओ शूट करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यानंतर याप्रकरणी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरण शांत होत असतानाच पुन्हा एकदा गौतमी पाटीलचा कार्यक्रम चर्चेत आला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान जोरदार राडा झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गौतमी पाटीलच्या आदकारीवर महाराष्ट्रातील तरुणाई सध्या बेधुंद होऊन थरकताना दिसतेय. गौतमीच्या कार्यक्रमाला मोठी होताना दिसते आहे. अनेक ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ होताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडलाय. सुरुवातीला गौतमीच्या अदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकत होती. मात्र काहीच वेळात गौतमीच्या कार्यक्रमात राडा होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार घडलाय.
गौतमी पाटलांचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरु झाला. यावेळी रिमिक्स गाण्यांवर तरुणाई गौतमी समोर चांगलीच थिरकली. या कार्यक्रमात तरुणांनी एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत कार्यक्रमात चांगलाच धुडगुस घातला.
दरम्यान, कार्यक्रम बंद करताच पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांसमोर भिडले. यावेळी गौतमीने देखील आपला डान्सचा कार्यक्रम थांबवला. अखेर राजगुरुनगर पोलीसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. मात्र कार्यक्रम संपल्याचे आयोजकांना जाहीर करावं लागलं.