'आजोबा मला...' चौथीतल्या मुलीने सांगितलेला किस्सा ऐकून शिक्षिका हादरली, थेट पोलीस स्टेशन गाठलं

Pune Crime: सध्या मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार (Sexual Harrasment) काही थांबावयचं नावं घेत नाहीत. पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. कधी बलात्कार तर कधी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न अनेकदा महिलांसोबत घडताना दिसतात. वयाचा भानही न राखता चक्क अनेक पुरूष महिलांवर (Male Dominance) अत्याचार करताना दिसतात त्यात लहान मुलींचाही बळी जातो. 

Updated: Jan 11, 2023, 04:34 PM IST
'आजोबा मला...' चौथीतल्या मुलीने सांगितलेला किस्सा ऐकून शिक्षिका हादरली, थेट पोलीस स्टेशन गाठलं title=
file

Pune Crime: सध्या मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार (Sexual Harrasment) काही थांबावयचं नावं घेत नाहीत. पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. कधी बलात्कार तर कधी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न अनेकदा महिलांसोबत घडताना दिसतात. वयाचा भानही न राखता चक्क अनेक पुरूष महिलांवर (Male Dominance) अत्याचार करताना दिसतात त्यात लहान मुलींचाही बळी जातो. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडताना दिसला आहे. यावेळी तर चक्क आपल्या सख्ख्या आजोबांनीच (Grandfather) आपल्या 11 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं सध्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपल्यासोबत झालेला हा गंभीर प्रकार तिनं शाळेत वर्ग सुरू असतात शिक्षकांच्या समोर सांगितला आणि तिच्या आजोबांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime A Teacher went to police station after hearing a shocking incident by 4th class student about his grandfather)

पुण्याच्या कोंढवा परिसरातील शाळेत चौथीच्या वर्गात गुड टच आणि बॅड टच याचा वर्ग सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अकरा वर्षाच्या मुलीनं आजोबा आपल्यासोबत कसे घाणेरडे चाळे करतात याचा पाढाच शिक्षकांसमोर वाचला. या प्रकरणी आता कोंढवा पोलीस ठाण्यात 60 वर्षीय आजोबांविरोधात (Pune Sexual Harrasment by Grandfather on Granddaughter) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. शाळेतील शिक्षिकेने (Teacher) या प्रकरणी तक्रार दिली आहे.

काय घडला नक्की प्रकार? 

पीडित मुलगी ही फक्त अकरा वर्षाची आहे. कोंढवा (Kondhava) परिसरातील एका शाळेत शिक्षण घेते. दरम्यान शाळेतील शिक्षक चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच याची माहिती देत होते. यावेळी पीडित मुलीने डिसेंबर महिन्यात तुझ्यासोबत घडलेला प्रकार शिक्षिकेला सांगितला. 'जब घर मे कोई नही होता था तब मुझे दादाजी गोद मे बिठाकर आगे पीछे करते थे' असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती शिक्षकांना दिली. आजूबाजूला त्रास द्यायचे तेव्हा त्रास होत असल्याने मी ओरडायचे तेव्हा मात्र आजोबा तोंड दाबून मला गप्प करायचे. इतकेच नाही तर त्यांनी मला घाणेरडे व्हिडिओ (Bold Videos) देखील दाखवले असे या चिमुरडीने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.  

हेही वाचा - Vamika Birthday: बघता बघता विरूष्काची वामिका झाली 2 वर्षांची! तिचा latest photo पाहिलात का?

पुणे हादरलं 

सध्या पुण्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. सध्या अशाच एका प्रकारानं पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे. सध्या कोयता गॅंगची (Koyta Gang) दहशतही पुण्यात पाहायला मिळते आहे. त्यामुळे सगळ्यांनाच याबद्दल धक्का बसला आहे. या प्रकारानं लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या या प्रकारांना आळा घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुलींना सुरक्षितेता मिळेल.