Pankaja Munde नविन वर्षात पंकजा मुंडे यांचा नवा संकल्प; संपूर्ण महाराष्ट्रात होतेय एकच चर्चा

 पंकजा मुंडे या मराठी महाराष्ट्रातील जनतेसह गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या तसेच वंजारी समुदायातील आणि ऊसतोड कामगार यांच्या प्रश्नावर ती प्रकर्षाने बोलत असतात. मात्र, आज नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांचा एक व्हिडिओ युट्युब(YouTube channel) वर त्यांनी अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आता आपण हिंदीमध्ये देखील देशभरातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितले. 

Updated: Jan 1, 2023, 05:59 PM IST
Pankaja Munde नविन वर्षात पंकजा मुंडे यांचा नवा संकल्प; संपूर्ण महाराष्ट्रात होतेय एकच चर्चा title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड :  नववर्षाच्या(New Year 2023) निमित्ताने युट्युब वरून हिंदी मध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी संवाद साधला. खर तर पंकजा मुंडे या मराठी महाराष्ट्रातील जनतेसह गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या तसेच वंजारी समुदायातील आणि ऊसतोड कामगार यांच्या प्रश्नावर ती प्रकर्षाने बोलत असतात. मात्र, आज नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांचा एक व्हिडिओ युट्युब(YouTube channel) वर त्यांनी अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आता आपण हिंदीमध्ये देखील देशभरातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितले. 

पंकजा मुंडे यांनी हिंदीत संवाद साधला आणि जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात सुरू झाली चर्चा

मराठी आणि अस्सल मराठवाडी भाषेमध्ये पंकजा मुंडे लोकांशी थेट संवाद साधतात. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली झाल्यानंतर त्यांचा वसा आणि वारसा जपण्यासाठी त्या राजकारणात ठामपणे उभा राहिल्या. त्यांनी काढलेली संघर्ष यात्रा आणि या संघर्ष यात्रेनंतर झालेल्या निवडणुका आणि त्यामध्ये भाजपला मिळालेले यश यामुळे पंकजा मुंडे यांनी आपण जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असल्याचा देखील उच्चार केला. त्यानंतर काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले.

2019 च्या निवडणुका आणि पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव

2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला. खरंतर माजी मुख्यमंत्री आणि सध्या असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये राजकीय मतभेद असल्याचे या ना त्या कारणाने समोर आले. मात्र, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर या दोघांमधील मतभेद आता संपले असल्याचं आणि आपण देवेंद्र फडणवीस हे आपल्या पक्षाचे नेते आहेत म्हणून भेटल्याचे देखील स्पष्ट केले. आमची अशी भेट होतच असते असं फडणवीस आणि मुंडे यांच्यातल्या क्रायसेस संपत असल्याचे संकेत दिले

पंकजा मुंडे यांचा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न?

विधानसभेच्या पराभवानंतर पक्षाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर पद देऊन पक्षासाठी काम करून सक्रिय राहण्यासाठी उभारी दिली आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी विविध राज्याच्या निवडणुकांमध्ये देखील प्रचार करत आपला वक्तृत्वाचा बाणा दाखवून दिला. त्यातच मध्यप्रदेश सारख्या हिंदी भाषिक राज्याची पक्षांतर्गत जबाबदारी देखील त्यांना मिळाली. त्यामुळे पंकजा मुंडे या हिंदीमध्ये आणि हिंदी भाषिक लोकांमध्ये आपलं व्यक्तित्व आणि पक्ष कार्यकर्त्यांसह चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण युट्युब वर येत असल्याचं आणि वेळोवेळी संवाद करत करणार असल्याचे सांगितले. जरी असलं तरी देखील या सर्वांवरून पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय व्हायचे की काय अशा चर्चा जिल्ह्यासह महाराष्ट्रभरात सुरू झाल्या आहेत. 

पंकजा मुंडे 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागल्या

2024 मध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. मात्र, 2024 ला लोकसभेच्या निवडणुका पहिल्यांदा होणार आहेत. पंकजा मुंडे यांना वेळोवेळी विचारला असता आता आम्ही 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागलो असल्याचं सांगितले. त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेची जागा लढवून राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय व्हायचे की काय अशी चर्चा जिल्हा सह राज्यभरामध्ये सुरु झाली आहे. पंकजा मुंडे यांनी थेट अजून यावरती बोलणं टाळलं जरी असलं तरी त्यांच्या मनातील भाव आजच्या तारखे मध्ये हिंदीतून लोकांशी साधलेला संवाद खूप काही सांगून जातो.