धक्कादायक! लहान भावाला संपवून मोठा भाऊ शेजारीच झोपला; शुल्लक कारणावरुन गेला जीव

Parbhani Crime News : आईच्या आजारपणात दोन्ही भाऊ एकत्र आले होते. मात्र शुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका भावाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे

Updated: Jan 1, 2023, 05:34 PM IST
धक्कादायक! लहान भावाला संपवून मोठा भाऊ शेजारीच झोपला; शुल्लक कारणावरुन गेला जीव title=

Parbhani Crime News : दोन भावांमध्ये झालेल्या शुल्लक वादातून एका भावाला जीव गमवावा लागल्याची घटना परभणीत घडली आहे. वादानंतर एका भावाने दुसऱ्या भावाचा गळा काचेच्या ग्लासाने चिरला. परभणी शहरातील साई कॉर्नर मराठवाडा प्लॉट येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक दिवसानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले होते. मात्र एकत्र येताच दोघांत शुल्लक वाद झाला आणि त्याचे रुपांतर हत्येत झाले.

हत्येनंतर बाजूलाच झोपला

सतीश कोडिंबा वाघमारे असे मयत भावाचे नाव आहे. तर सुनिल कोंडीबा वाघमारे असे खून केलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घराची पाहणी केली असता सतीश वाघमारे हे खाली पडलेले दिसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर सुनिल वाघमारे हा बाजूला कॉटवर झोपलेला होता. यानंतर पोलिसांनी सुनिला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

"तू येथे कशाला आला"

वाघमारे भावंडांच्या आई शकंतुलाबाई या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे शनिवारी सुनील वाघमारे हे घरी आले होते. त्यावेळी सतिशने माझ्या तोंडावर ठोसा मारुन तू येथे कशाला आला असे म्हणत पाय धरून पलंगाखाली पाडले. त्यानंतर मारहाण करु लागला, असे सुनीलने सांगितले. यानंतर राग आल्याने कळशी, काचेचा ग्लास चाकूने सतिशवर वार केल्याची कबुली आरोपी सुनिलने पोलिसांकडे दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी रामचंद्र वाघमारे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी भावावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.