विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस करणार अतिवृष्टी भागाचा दौरा

देवेंद्र फडणवीस यांचा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच दौरा

Updated: Oct 17, 2020, 02:03 PM IST
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस करणार अतिवृष्टी भागाचा दौरा  title=

मुंबर्ई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाच दौरा करणार आहेत. तसेच ते शेतकऱ्यांच्या भेटी देखील घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 

बारामतीपासून हा दौरा सुरु होणार असून कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी ते उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी ते हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. 

या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 किमीचा प्रवास करुन शेतकऱ्यांच्या भेटी आणि पाहणी करणार आहेत.