नाशिक : निफाड येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने मुलीची हत्या केली. चाकू हल्ला करीत असताना मुलीचे वडील आपल्या मुलीला वाचविण्यासाठी मदतीला गेले असता या माथेफिरुने त्यांच्यावरही चाकू हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झालेय. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विद्या चंद्रकांत ढेंगळे हिच्यावर सुरज चव्हाण या माथेफिरुचे एकतर्फी प्रेम होते. प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याने वडिलांसमोरच विद्यावर चाकू हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, मुलीवर हल्ला होत असल्याचे लक्षात येतात तिला वाचविण्यासाठी चंद्रकांत ढेंगळे धावले. यावेळी या माथेफीरुने त्यांच्यावरही हल्ला केला. दरम्यान, चाकू हल्ल्यात विद्या हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनात गुन्हा नोंदविण्यात आलाय.
जमखमी चंद्रकांत यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. दरम्यान, सुरज आणि विद्या यांच्यात भांडण झाले होते, अशी माहिती पुढे आलेय. त्यानंतर सुरज यांने तिच्यावर चाकू हल्ला केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी सुरज याला अटक केली आहे.