निरंजन डावखरेंचं राष्ट्रवादी सोडण्यामागचं कारण

निंरजन डावखरे यांनी ट्विट करुन दिली माहिती.

Updated: May 23, 2018, 03:03 PM IST
निरंजन डावखरेंचं राष्ट्रवादी सोडण्यामागचं कारण title=

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर मी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. यापुढील वाटचाल मी लवकरच जाहीर करेन. असं त्यांनी म्हटलं आहे.

निरंजन डावखरे याआधी शिवसेनेत जाणार असल्याची देखील चर्चा होती. निरंजन डावखरे हे भाजपकडून कोकण पदवीधरची निडवणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे. निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे सुपुत्र आहेत. निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणं हे भाजपसाठी फायद्याचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. ठाण्यामध्ये भाजपला यामुळे एक तरुण चेहरा मिळणार आहे. वसंत डावखरे यांचं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठं वर्चस्व आहे. निरंजन डावखरे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.