OBC आरक्षणाबाबत धनंजय मुंडे यांची आक्रमक भूमिका

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील 92 नगर परिषद आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निवडणुका 6 महिने पुढे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Updated: Jul 9, 2022, 05:09 PM IST
OBC आरक्षणाबाबत धनंजय मुंडे यांची आक्रमक भूमिका  title=

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील 92 नगर परिषद आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निवडणुका 6 महिने पुढे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

या निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

ओबीसी आरक्षण संदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे नवीन सरकारने तातडीने योग्य ती कारवाई पूर्ण केली पाहिजे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणूक आयोगाकडे विनंती करणार असल्याचं स्पष्ट केलं. जाहीर झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नये यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. 

पावसाळ्यात निवडणुका घेऊ नये यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.