बदनामीच्या कारणाने 'त्या' दोघांची हत्या, मृतदेह नदीपात्रात सापडले

Nagpur Crime News : वेणा नदीपात्रात महिला आणि पुरुष यांचे मृतदेह गुरुवारी आढळले होते. या प्रकरणाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी 24 तासात उलगडा केला आहे. बदनामीच्या रागातून आणि शेतीच्या वादातून सख्ख्या भावांनी हे दुहेरी हत्याकांड केल्याचे उघडकीस आल आहे.याप्रकरणी पोलिसांनी तीन भावंडांसह पाच जणांना अटक केली आहे 

Updated: Jul 9, 2022, 03:43 PM IST
बदनामीच्या कारणाने 'त्या' दोघांची हत्या, मृतदेह नदीपात्रात सापडले title=
संग्रहित छाया

नागपूर : Nagpur Crime News : वेणा नदीपात्रात महिला आणि पुरुष यांचे मृतदेह गुरुवारी आढळले होते. या प्रकरणाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी 24 तासात उलगडा केला आहे. बदनामीच्या रागातून आणि शेतीच्या वादातून सख्ख्या भावांनी हे दुहेरी हत्याकांड केल्याचे उघडकीस आल आहे.याप्रकरणी पोलिसांनी तीन भावंडांसह पाच जणांना अटक केली आहे 

बुटीबोरी नजीक रुईखैरी शिवारात वेणा नदीच्या पुलावरुन जात असताना गुरुवारी सकाळी नदीपात्रात पुरुष आणि महिला असे दोन अनोळखी मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर एकच खळबळ माजली. या दोन्ही मृतदेहांचे हात- पाय दोरीने बांधून सुमारे 25 किलोचा दगड बांधून ते पाण्यात टाकण्यात आले होते. या दुहेरी हत्या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी 24 तासात उलगडा केला.

स्वत:च्या पत्नीला सोडून एका विवाहित महिलेसोबत भाऊ राहत असल्यामुळे समाजात कुटुंबीयांची होणारी बदनामी आणि शेतीच्या वादातून भावांनीच सख्ख्या भावासह त्याच्या प्रेयसीचा हत्या केल्याचे तपासात उलघगडा झाला. उत्तम सुरेश बोडखे (31, बिहाडी, ता. कारंजा घाडगे, वर्धा) आणि  38 वर्षीय महिला यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी उत्तमचा भाऊ राहुल सुरेश बोडखे (27 ) , खुशाल सुरेश बोडखे (29 ), विजय वसंत) बोडखे (30 वर्ष) आणि आकाश राऊत (24 वर्ष) यांना अटक केली आहे.

 असा झाला हत्येचा उलगडा

याप्रकरणी पोलिसांनी मृतकांची ओळख तसेच आरोपींचा छडा लावण्याकरिता एकूण पाच पथके तयार केली होती. परिसरातील 'सीसीटीव्ही' तपासण्यात आले. मृतांचे फोटो सोशल मीडिया आणि माहितीच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांना मृतांची ओळख पटण्यास मदत झाली. हत्या झालेली महिला ही विवाहित असून, तिला दोन मुले होती. मात्र, ती पतीपासून वेगळी राहत होती. तसेच उत्तमचेही लग्न झाले होते आणि त्याने आपल्या पत्नीला सोडून दिले होते. हे दोघे बांधकाम कामगार म्हणून काम करीत होते आणि बरेच दिवस इसासनी येथील भीमनगर झोपडपट्टीत एकत्र राहत होते. त्यांच्या अशाप्रकारे एकत्र राहण्यामुळे गावात बोखडे कुटुंबाची बदनामी होत होती, असा कुटुंबीयांकडून आरोप करण्यात येत होता.

 भावांनी उत्तमला या महिलेपासून दूर राहण्याबाबत अनेकदा समजावून सांगितले.त्यानंतरही तो ऐकत नसल्याने भावांनी उत्तमचा काटा काढण्याचे ठरविले. त्याकरिता त्यांनी कट रचला. भावांनी उत्तमला बिहाडी येथे बोलावले. उत्तम आणि महिला दोघेही येत असताना आरोपींनी उत्तमला बाजारगाव येथे गाठले. वाहनात बसवून त्यांची हत्या केली. हत्येनंतर वेणा नदीच्या पुलावर आले आणि दोघांचे मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.